गडचिरोलीमध्ये नदीत बुडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, आजीसोबत आंघोळीसाठी गेला होता

शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 (12:17 IST)
चंद्रपूर जिल्ह्यातील एक 12 वर्षांचा मुलगा त्याच्या आजीसोबत मार्कंड देव येथे स्नानासाठी गेला असून नदीच्या पाण्यात बुडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.तो चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याचा व्याहाड बुज येथील रहिवासी होता. हा गडचिरोली जिल्ह्यातील खारापुंडी येथे आपल्या आजीकडे राहत होता.
ALSO READ: महाराष्ट्रातील वाद सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात येणार
आजी सोबत तो मार्कंड देव येथे स्नानासाठी गेलेला असता नदीपात्रात अंघोळ करत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात गेला. त्याला पोहता येत नव्हते तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. 
ALSO READ: माणिकराव कोकाटे अडचणीत, त्यांना राजीनामा देण्यासाठी या नेत्यांनी तयार केली टीम
आजूबाजूच्या लोकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले. मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बातमी परिसरात पसरतातच शोककळा पसरली आहे. 
 
Edited By -Priya Dixit
ALSO READ: दहावीच्या मराठी पेपरफुटी प्रकरणात प्रश्नपत्रिका हाताने लिहिल्याचा महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा दावा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती