शिवसेनेचे 12 आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचेही अनेक आमदार भाजपच्या संपर्कात : बबनराव लोणीकर

सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (16:02 IST)
शिवसेनेचे 12 आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचेही अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. विरोधी पक्षाला सरकार पाडण्यात कोणताही रस नाही, असं सांगताना महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात अ्सल्याचा दावा मात्र त्यांनी केला आहे. बबनराव लोणीकर नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपच्या संपर्कात महाविकास आघाडीचे आमदार असल्याचा दावा केला. तसंच आम्ही कधीही सरकार पडेल किंवा आम्ही सरकार पाडणार आहोत, असं म्हटलेलं नाही. मग सत्ताधारी वारंवार सरकार मजबूत आहे, पडणार नाही, असं का सांगत आहेत?, असा सवाल केला आहे. 
 
शिवसेनेचे 12 आमदार पक्षात नाराज आहेत. त्याची काही उदाहरणं द्यायची म्हटली तर सुभाष साबणे, प्रताप सरनाईक अशी देता येतील. खूप लोकांना खूप काही बोलायचं आहे. पण त्यांना बोलता येत नाही. असेच सेनेचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही आमदार आमच्या संपर्कात आहे. सरकारच्या पापाच्या घडा भरलाय. लवकरच तो फुटणार आहे, असा इशाराही त्यांना दिला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती