मुंबईत एका 11 वर्षाच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबईतील मालाड मालवणी येथे ही घटना घडली आहे. या मुलाचा मृतदेह बाथरूम मध्ये आढळला.मुलाने बाथरूमच्या दाराला बंद करून गळफास घेतल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.
मयत मुलगा मालवणीत राहत असून आपल्या मोठ्या भावासह मालाडजवळील मदरशात शिकायचा शनिवारी संध्याकाळी इतर विद्यार्थी बाहेर खेळायला गेले मात्र हा तिथेच थांबला आणि बाथरूमच्या दाराला बंद करून आतमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.कुटुंबियांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी टाहो फोडला.मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.