राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 11 निर्णयांना मान्यता!
बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (21:21 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये धनगर समाजाच्या विकासासाठी शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याचसोबत मुंबईतील नरीमन पॉईंट या ठिकाणी असलेली एअर इंडियाची इमारत ताब्यात घेण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रमुख निर्णय
धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तिप्रदत्त समिती. ( इतर मागास बहुजन कल्याण)
राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. 4250 कोटी तरतुदीस मान्यता
( उद्योग विभाग)
मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. 2200 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार.
( जलसंपदा विभाग)
अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार
( वैद्यकीय शिक्षण)
मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.