10th Exam 2022 :दहावी परीक्षा ऑनलाईन अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ

मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (12:55 IST)
दहावी परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून  विद्यार्थी अर्ज आता 26 डिसेंबर पर्यंत आणि विलंब शुल्कासह 1जानेवारी  2022 पर्यंत करू शकतात .  
ही मुदतवाढ सर्व नियमित, खासगी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसाठी लागू राहील. याआधी उमेदवारांना 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत आणि विलंब शुल्कासह 21 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत अर्ज भरायचे होते. पण एसएससी बोर्डाने यामध्ये पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.
अर्ज भरताना माध्यमिक शाळांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
नव्या सुधारित वेळापत्रकानुसार नियमित शुल्कासह 26 डिसेंबर 2021 पर्यंत तर विलंब शुल्कासह 27 डिसेंबर ते 1 जानेवारी 2022 या कालावधीत दहावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
माध्यमिक शाळा थेट डेटाबेसवरून नियमित असलेल्या विद्यार्थ्यांची अर्ज भरू शकतात. या नंतर 6 जानेवारी 2022 पर्यंत शाळाचलन द्वारे बॅंकेत शुल्क भरता येईल .
नंतर माध्यमिक शाळांनी आपली विद्यार्थ्यांची यादी मंडळाकडे 4 जानेवारी 2022 पर्यंत जमा करावी. अधिक माहितीसाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mahahsscboard.in/ भेट देऊन माहिती मिळवू शकाल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती