100 दिवसांत सरकार अपयशी - मुख्यमंत्री चव्हाण

मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (15:42 IST)
पंतप्रधान मुंबईत आले त्यावेळी मी प्रत्येकवेळी प्रोटोकॉल पाळला. परंतु सभेमध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मी उपस्थित केले. परंतु त्यांच्याकडे पंतप्रधानांनी दुर्लक्ष केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच माझ्या भाषणाच्यावेळी हेतुपुरस्सर व नियोजनपूर्वक हुल्लडबाजी केल्याचा आरोप पुन्हा चव्हाण यांनी केला. हा प्रकार महाराष्ट्र, झारखंड व हरयाणामध्ये झाले आणि त्यामुळेच हे उच्चस्तरावरून जाणीवपूर्वक केल्याचे दिसत आहे असे चव्हाण म्हणाले.
 
स्मार्ट सिटी, नवीन आयआयटी व आयआयएम यांच्या घोषणा सरकारने केल्या, परंतु त्यासाठी देण्यात आलेले पैसे बघता ही शुद्ध फसवणूक असल्याची टीका मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली.
 
विद्यार्थ्यांनी आपलं भाषण ऐकलंच पाहिजे अशी सक्ती पंतप्रधानांनी केल्याची बाब चुकीची असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मुलांच्याबाबतीत अशी प्रपोगंडा करण्याची पद्धत चुकीची असल्याचे चव्हाण म्हणाले.
 
भीषण ऊर्जाटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून पंतप्रधानांनी स्वत: सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवायला हवी अशी मागणी आपण केल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
 
सुप्रीम कोर्टात असलेल्या कोळसा खाणींच्या वाटपासंदर्भात सुनावणी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वीजटंचाई टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे - पृथ्वीराज चव्हाण देशात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर केली आहे.
 
नरेंद्र मोदी केंद्रामध्ये एकाधिकारशाही करत असून त्यांनी आधी दिलेली आश्वासनं पाळली नसल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
 
लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना नरेंद्र मोदी यांनी कस्पटासमान लेखून संसदीय बोर्डातून बाहेर काढल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
 
१०० दिवसांत मोदींचे सरकार अपयशी ठरले आहे, कोणतेही आश्वासने पूर्ण करू शकले नाही - मुंबईत काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत माणिकराव ठाकरेंची टीका.

वेबदुनिया वर वाचा