'दादा राजीनामा मागे घ्या'!

WD
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनात एका ठरावाद्वारे केली. दरम्यान, अजित पवार यांचे समर्थक समजले जाणार्‍या 12 अपक्ष आमदारांनी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिल्याचेही वृत्त आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री पद रिक्तच राहील, असे सूचित केले. तथापि, अंतिम निर्णय हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेच घेणार आहेत. शुक्रवारी मुंबईत येऊन ते पक्षातील स्थितीचा आढावा घेतील.

वेबदुनिया वर वाचा