‘हॉर्न नो प्लीज’...ओके!

शनिवार, 2 मे 2015 (11:43 IST)
मुंबई- ‘हॉर्न ओके प्लीज’ या वाहनांवर लिहण्यात येत असलेल्या संदेशामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याने  प्रशासनाने या सूचनेवर बंदी आणली आहे. वाहनांवरील ही सूचना काढून टाकण्याचा फतवाही काढण्यात आला आहे.

‘हॉर्न ओके प्लीज’ अशा संदेशामुळे कुठेही हॉर्न वाजवण्याची परवानगी असल्याचा चुकीचा संदेश जनमानसात जात असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच हा प्रकार परिवहन कायद्याचे उल्लंघन करणारा आहे.  या संदेशामुळे वाहक कुठेही हॉर्न वाजवतात. त्यामुळे ट्रक, टेंपो यांसारख्या मालवाहतूक वाहनांसह इतर प्रवासी वाहनांनी हा संदेश काढून टाकावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

वेबदुनिया वर वाचा