मुंबई महापालिकेची स्वायत्तेची हमी मिळाली तर जीएसटी घटनादुरुस्तीला पाठिंबा देऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर जीएसटीच्या आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. आज (सोमवारी) जीएसटीच्या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांनी जीएसटी विरोधात केलेली विधाने महत्त्वाची मानली जात आहेत.