नागरिकांना सेवा पुरविणसाठी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू करण्यात आले असून सध्या 150 सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. सर्व नागरिकांना पारदर्शक पध्दतीने सेवा पुरविण्याचा उद्देश्य असल्याचे मुख्मंत्र्यांनी स्पष्ट केले. जनतेसाठी ‘सेवेचा अधिकार’ या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी आपले प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.