हार्बरवर धावली 12 डब्यांची लोकल

शनिवार, 30 एप्रिल 2016 (12:39 IST)
बहुचर्चित 12 डब्यांची लोकल अखेर हार्बर रेल्वेच्या प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू झाली आहे. दररोज लोकल मधील वाढणारी गर्दी आणि होणारे अपघात यामुळे रेल्वे प्रशासनाने हार्बर रेल्वेवर लोकलच्या डब्ब्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. हार्बर मार्गावर १२ डबा लोकल चालविण्यासाठी फलाटांची लांबी वाढवण्यात आली आहे.सध्या हार्बरवर नऊ डब्यांच्या ३६ लोकल धावत असून त्यांच्या रोज एकूण ५९0 फेऱ्या होतात. ३६ लोकलला प्रत्येकी तीन डबे जोडल्यास प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढणार आहे.

वेबदुनिया वर वाचा