'सैराट' पायरसी प्रकरणी सहा जणांना अटक

शुक्रवार, 6 मे 2016 (14:47 IST)
पायरसी प्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 23 सीडी जप्त करण्यात आल्या आहेत. ‘सैराट’ची पायरटेड कॉपी बनवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सैराटची कॉपी पायरेट करणाऱ्या सुरेंद्र घोसाळकर (34), हशीम खान (21), शाहबाज खान (22), मुश्ताक खान (23), इबनेश शाह (34) आणि अब्दुल शाह उर्फ बबलू (22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. कारवाईदरम्यान आरोपींकडून सैराटच्या 23 सीडी, 3 कॉम्प्युटर आणि जवळपास 6 हजार रिकाम्या सीडी जप्त करण्यात आल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा