कणकवली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर संदेश पारकर गटाने अर्ज दाखल केले होते. शिवसेना - भाजपाच्या नगरसेवकांची साथ मिळाल्याने पारकर गटाच्या माधुरा गायकवाड यांनी काँग्रेसच्या सुविधा साटम यांचा पराभव केला. पारकर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादीत असतानाही त्यांनी नारायण राणेंना आव्हान दिले होते.