सावित्री नदीत बुडालेली एक बस सापडली

शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016 (12:01 IST)
सावित्री नदीच्या पात्रात बुडालेल्या दोन एसटी बसपैकी राजापूर – बोरिवली ही एक बस शोधून काढण्यात अखेर नौदलाला यश आलं आहे.  या एसटीचा छत पूर्णता रिकामा झाला आहे. क्रेनच्या सहाय्याने ही एसटी बाहेर काढण्यात आली. दुर्घटना स्थळापासून 200 मीटर अंतरावर सापडली आहे.

या दुर्घटनेत 42 जण वाहून गेल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. महाड आणि पोलादपूर या दोन शहरांना जोडणारा हा ब्रिटीशकालीन पूल होता. पुलावरुन जाणाऱ्या दोन एसटी बसेससह सात ते आठ वाहनंही वाहून गेली. वाहनांमध्ये राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश आहे.  ब्रिटिशकालीन महाड-पोलादपूर पूर कोसळून दुर्घटनारायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात, मुंबई-गोवा महामार्गावरील, महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल मंगळवारी  2 ऑगस्टच्या रात्री साडेअकरा वाजता वाहून गेला.  या पुरात 2 बसेस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेले. यामधील 27 मृतदेह शोधण्यात जवानांना यश आलं आहे.

वेबदुनिया वर वाचा