सहावे विश्व मराठी साहित्य संमेलन भूतानमधे

गुरूवार, 1 सप्टेंबर 2016 (11:01 IST)
पुणे- विश्व मराठी परिषदेच्यावतीने घेण्यात येणारे सहावे विश्व मराठी साहित्य संमेलन थिम्पू (भूतान) येथे येत्या 22 आणि 23 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. ‘मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया’ या विषयावर हे संमेलन आधारित असणार आहे. संमेलनामध्ये झालेल्या चर्चा, परिसंवाद आणि व्याख्याने प्रकाशित करून मराठी अभिजात भाषा समितीकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
 
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी लेखक संजय आवटे यांची निवड करण्यात आली आहे.
 
स्वागताध्यक्षपदी नीलेश गायकवाड असणार आहेत. संमेलनाध्यक्ष संजय आवटे यांच्या नावावर ‘बराक ओबामा-बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड’, या विक्रमी खपाच्या पुस्तकासह ‘नव्या जगाचे नवे आकलन’, ‘कला कल्पतरूंचे आरव’, ‘पाकिस्तान लष्करी सत्तेचे अर्थरंग’ ही पुस्तके आहेत. संमेलनाचे उद्घाटन भूतानचे शिक्षणमंत्री ठाकूरसिंग पोडियाल यांच्या हस्ते होणार आहे. मॉरिशस येथील संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष शाम जाजू यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा