सर्वधर्मीयानं कुटुंबनियोजन सक्तीचे करा: उद्धव

मंगळवार, 7 जुलै 2015 (10:04 IST)
मुंबई- भारतातील धर्मांध मुसलमान या देशाचे नागरिक म्हणून नव्हे तर मुसलमान म्हणून जगत आहेत. धर्म म्हणून लोकसंख्या जाणीवपूर्वक वाढवून रक्तहीन क्रांतीने देश काबीज करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. अशावेळी समान नागरी कायदा अमलात आणून सर्वधर्मीयांसाठी सक्तीचे कुटुंबनियोजन केले पाहिजे. देश वाचवण्याचा हाच एकमेव तोडगा आहे, असे सडेतोड विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहेत.
 
मुसलमानांनी अर्ध्यारात्री जरी हाक मारली तरी मदतीस धावण्याचे वचन पंतप्रधान मोदी यांनी दिले, पण त्या बदल्यात मुसलमान समाज देशाच्या मदतीस धावणार आहे काय? असा रोखठोक सवालही त्यांनी केला आहे. देशातील मुस्लिमांची संख्या 2001 ते 2011 या काळात 24 टक्क्यांनी वाढल्याचे जनगणनेतील आकडेवारीतून समोर आल्यानंतर ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव यांनी पुन्हा शिवसेनेची कट्टर हिंदुत्वाची भूमिका मांडली आहे.

वेबदुनिया वर वाचा