सप्तशृंगी गडावरील घाटात अपघात, ३० प्रवाशी जखमी

शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016 (16:07 IST)
सप्तशृंगी गडावरील घाटात अपघात झाला आहे. सदरचा अपघात नांदुरीपासून दोन किलोमीटर अंतरावर शुक्रवारी पहाटे झाला. यात दोन बस एकमेकांसमोर धडकल्या. या अपघातात ३० प्रवाशी जखमी झाले आहेत. यावेळी घाटात जमलेल्या दाट धुक्यामुळे हा अपघात घडल्याचे समजते. अपघातात जखमी झालेल्या ३० प्रवाशांपैकी २० प्रवासी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात तर १० जखमी गडावरील न्यासाच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. अपघातातील जखमीना तातडीने प्रत्येकी ५०० रुपये मदत देण्यात आली आहे.
 
जखमी प्रवाशांची नावे खालीलप्रमाणे : 
संदीप साळवे २८, गणेश सालवे २६, सुरज खोतकर २४ भाऊसाहेब साळवे ३४, मदन साळवे ३२, अमोल घुमरे २४, सर्व. सोमठाण ता. सिन्नर. राजेंद्र शिंदे १७, गयाबाई बर्डे  ४०, भास्कर बर्डे ४५, मनिषा बर्डे १९, सौरभ रोकडे १७, चंद्रकात सांगळे, रा. हिंगेवाडी, ता. सिन्नर  अशोक रोकडे ४५, विलास वाघ ३५, दिलीप रोकडे ४०, लक्ष्मण बागले ४७, भगवान रोकडे ३२, शांताराम गजानन वाघ ३५, शांताराम तोडावत ५०, दत्तु निमोणे ४५, बंडु वाघ ३०, कैलास अहिरे २७, अंदानेर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद अशी आहेत.

वेबदुनिया वर वाचा