शिवाजी पार्कातच घुमणार दसरा मेळाव्याचा आवाज

शनिवार, 17 ऑक्टोबर 2015 (10:57 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी वर्षातील दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कवर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
मनसेने शिवसेनेला मैदान देण्यास विरोध केला. मनसेने न्यायालयात अर्ज करून शिवाजी पार्क मैदान नाकारण्यात आले होते. त्यामुळे सर्वांना समान न्याय हे तत्त्व धाब्यावर बसवले गेले, असा दावा केला. मात्र मनसेची विनंती अमान्य करताना शिवसेनेला मैदान देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा