शिवसेना-भाजपमध्ये कटुता नाही : दानवे

बुधवार, 27 मे 2015 (12:02 IST)
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांमध्ये कोणतीही कटुता नाही आणि शतप्रतिशत भाजप हा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधात नाही असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. मोदी सरकारच्या  वर्षपूर्तीनिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना दानवे यांनी काँग्रेसवर टीका केली. 
 
दानवे म्हणाले की, आमच्या वर्षपूर्ती समारंभाबाबत वर्षश्रद्ध असले शब्द वापरणार्‍या काँग्रेस पक्षाचेच खरे म्हणजे श्रद्ध जनतेने गेल्या वर्षी घातलेले आहे. आता ते हा जो पुण्यतिथी म्हणून कार्यक्रम करीत आहेत त्याकडे ङ्खार गांभीर्याने पाहण्याची कारण नाही. कारण हा कार्यक्रम मृतावस्थेत असणार्‍या काँग्रेसच्या पुढार्‍यांना जिवंत करण्यासाठी आहे, अशीही टीका दानवेंनी केली.
 
शिवसेनेचे अधिवेशन भरते तेव्हा त्याही पक्षाचे नेते शतपतिशत शिवसेना असा कार्यक्रम आपल्या कार्यकत्र्यांपुढे ठेवू शकतात, प्रत्येकच पक्ष स्वत:च्या वाढीसाठी प्रयत्न करतच असतो, असेही दानवे म्हणाले. कोल्हापूर येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात कार्यकत्र्यांना सांगण्यात आले आहे की, केंद्र व राज्य सरकारांच्या योजनांची माहिती वर्षभर सातत्याने जनतेला सांगण्यासाठी जनसंपर्क अभियान सुरु ठेवावे. मुख्यमंत्री देवेंद्र ङ्खडणवीस यांच्या कामाविषयी कोणीही नाराज नाही, त्याबाबत वृत्तपत्रांत येणार्‍या बातम्या तथ्यहीन आहेत. मुख्यमंत्री हे गृहमंत्री म्हणूनही उत्तम कामगिरी करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडचे गृहखाते काढून घ्या असे कोणीही म्हणत नाही अशा शब्दात त्यांनी या बाबतचे प्रश्न उडवून लावले. 

वेबदुनिया वर वाचा