हिवाळी अधिवेशनात विरोधातच बसणार असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. राऊत म्हणाले, विरोधी बाकावर बसण्याच्या निर्णयावर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कायम असून नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही आम्ही विरोधी भूमिकेतच राहाणार आहेत.
राज्यात दुष्काळ, वीज, पाणी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांनी राज्याला ग्रासले आहे. विरोधी पक्ष म्हणून शिवसेन या मुद्यांवर येत्या अधिवेशना त आम्ही विरोधकाची भूमिका पार पाडणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.