बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन एक अफवा असल्याचा संशय पोलिसांना वाटतोय. पण मुंबईतील 7/11 रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेच्या दोषींना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कुठलीही कुचराई न बाळगता धमकी दिलेल्या सर्व ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच तिन्ही ठिकाणी बॉम्ब स्कॉडही नेमण्यात आलेत.