वंचितांसाठी झटणारे साहित्यिक- भुजबळ

वेबदुनिया

बुधवार, 29 सप्टेंबर 2010 (18:30 IST)
84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उत्तम कांबळे यांची निवड झाल्यानंतर उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उत्तम कांबळे हे वंचितांसाठी झटणारे साहित्यिक असून, त्यांचा हा सार्थ गौरव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
कांबळे एक उत्तम पत्रकार तर आहेतच, शिवाय ते श्रेष्ठ लेखक असल्याचे मत भुजबळांनी व्यक्त केले आहे.

वेबदुनिया वर वाचा