लालूप्रसाद यादव यांच्या हार्टवर होणार दोन ह्रदयशस्त्रक्रिया

बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (13:58 IST)
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर आज (बुधवार)  मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दोन ह्रदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांच्या हार्टमधील एऑर्टिक  व्हॉल्व्ह बदलण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. 
 
एशियन हार्ट इन्स्टिट्यूटतील पाच डॉक्टरांचे पथक लालूप्रसाद यादवांवर शस्त्रक्रिया करणार असल्याचे डॉ.रमाकांत पांडा  यांनी सांगितले. दोन्ही शस्त्रक्रियांसाठी सुमारे पाच तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, लालूप्रसाद यादव यांना रविवारी (24 ऑगस्ट) रात्री उशीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.  सोमवारी आणि मंगळवारी त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर लालूप्रसाद यांच्यावर  शस्त्रक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लालूंची पत्नी राबडी देवी, मुली आणि जावई सगळे रुग्णालयात  उपस्थित आहेत.

वेबदुनिया वर वाचा