त्वरित पैसे कमवण्यासाठी नाशिक येथील तरूणाने घरातील वडिलोपार्जीत वाघाची कातडी विक्री करण्याचा डाव पोलीसांनी हाणून पाडला आहे. वाघाची कातडी विक्रेत्यास सरकारवाडा पोलिसांनी तबय्त घेतले आहे.आय वाघाच्या ही कातडी सुमारे 25 लाख रूपये किमतीची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कातडीचे नमुने न्यायवैध्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्तात्रेय कराळे यांनी दिली.