राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांना अटक व सूटका

शनिवार, 18 ऑक्टोबर 2014 (10:30 IST)
पाथरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह त्यांच्या 40 जणांना पोलिसांनी अटक केली. सगळ्यांना पाथरी कोटोत हजर केले असता सगळ्यांची जामिनावर सुटका केली.

काँग्रेसचे पाथरी तालुकाध्यक्ष प्रभाकर शिंदे त्यांच्या मुलाला मारहाणप्रकरणी बाबाजानी यांना अटक करण्यात आली होती.

पाथरीतील देवनांद्रा येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस समर्थकांत हाणामारी सुरू झाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला होता. यादरम्यान, केंद्रापासून जवळच घर असलेल्या तालुकाध्यक्ष शिंदे यांच्या घरावर बाबाजानी समर्थकांनी हल्ला केला होता. त्यांनी शिंदे यांच्या घरात घुसून शिंदे यांच्यासह त्यांचा मुलगा परीक्षित यालाही जबर मारहाण केली होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या प्रकारानंतर मध्यरात्री आमदार बाबाजानी, त्यांचा मुलगा नगराध्यक्ष जुनेदखान दुर्राणी, नगरसेवक हन्नानखान यांच्यासह शंभरावर समर्थकांवर तालुकाध्यक्ष शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथरी पोलिसांत गुन्हे दाखल झाले होते. गुरुवारी दिवसभर पाथरीत तणाव होता. पोलिसांनी शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास बाबाजानी त्यांच्या 40 समर्थकांना अटक केली.

वेबदुनिया वर वाचा