राष्ट्रवादीची फिफ्टी-फिट्टीची मागणी काँग्रेसने फेटाळली

गुरूवार, 24 जुलै 2014 (20:06 IST)
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने 144 जागांची मागणी कॉंग्रेसने फेटाळून लावली आहे. आघाडीची  बुधवारी रात्री बैठक झाली त्यात कॉंग्रेसने राष्‍ट्रवादीच्या मागणीला स्पष्ट नकार दिला. 50 टक्के जागांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर दबाब आणण्याचा प्रयत्न करत आहे.

2009 मध्ये झालेल्या विधानसभा जागावाटपाच्यावेळी हाच फॉर्म्युला वापरण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीने जास्त जागा जिंकल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत 50 टक्के जागांवर दावा केला आहे.

काँग्रेसला राष्ट्रवादीची मागणी मान्य नाही. दरम्यान, काही जागांची अदलाबदली करण्यास कॉंग्रेसने होकार दर्शवला आहे. या बैठकीला काँग्रेसकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि प्रभारी मोहन प्रकाश तर   राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा