राज्य सरकार अजहर व रूबीनाला घर देणार

ऑस्कर विजेता चित्रपट स्लमडॉग मिलीनियरचे बाल कलाकार अजहर आणि रूबीना यांना राज्य सरकारकडून लवकरच घरे दिली जाणार असल्‍याची घोषणा करण्‍यात आली आहे. म्हाडाच्‍या प्रस्तावास राज्य शासनाची मंजुरीही मिळाली आहे.

आर्थिक दृष्‍ट्या कमकुवत श्रेणीतील कोट्यातून ही घरे दिली जाणार आहेत. 180 स्‍के.फूट आकाराची ही घरे दहीसर आणि घाटकोपर भागात आहेत.

दोघांची घरे नुकतीच महापालिकेने अतिक्रमण निर्मुलन मोहीमेंतर्गत तोडण्‍यात आली होती. सरकार दोघांना घरे देणारे हे ऑस्‍कर पुरस्‍कारानंतरच जाहीर केले होते. मात्र नंतर निवडणूक आचार संहितेमुळे ते लांबले.

वेबदुनिया वर वाचा