राज्यात सर्वत्र दमदार पाऊस

मुंबई- महाराष्ट्राच्या सर्वच भागांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. कोकण किनारपट्टीसह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच विदर्भातही अनेक नद्यांना पूरसदृश परिस्थिती निङ्र्काण झाली आहे. ठाणे, मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत असून सतर्कतेचा इशारा देणत आला आहे.
 
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोटसह सोलापूर शहरात रात्रभर पाऊस सुरु आहे. अक्कलकोट तालुक्यातील बादोले गावात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने गाव तलावाचा बांध फुटला. गावातल्या शेतकर्‍यांच्या शेतात पाणी वाहून गेले. एका बाजूचा बांध फुटल्याने पावसाने भरलेल्या तलावातील पाणी वाया जाते आहे.
 
लातूरबरोबर उमरगा, दाळींब सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या भागात जवळपास 148 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. उमरगा तालुका 75 मि.मी. सरासरी पाऊस पडला. लातूर जिल्ह्यातील, मांजर, रेणा, जाना, घरणी, तावरजा, मुडगूळ नदीसह सातही नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा