राज्यात की केंद्रात याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ-पंकजा मुंडे

शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (13:25 IST)
दिवंगत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि आमदार पंकजा मुंडे-पालवे यांचा संभ्रम  अजूनही कायम असल्याचे दिसते. पक्षाचे काम राज्यात करावे की केंद्रात करावे याबाबत असून पंकजा यांनी अजुन  निर्णय घेतलेला नाही. पक्षाने केंद्रात पाचारण केले असले तरी तूर्त तरी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत.  त्यामुळे केंद्र की राज्य याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेऊ, असे पंकजा यांनी पत्रकारांना सांगितले.

आल्या संघर्ष यात्रेला सुरूवात करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी आपला संभ्रम आता दूर झाल्याचे सांगितले होते. यापुढे  राज्यात पक्षाचे काम करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यापाठोपाठ परभणीत  ‘योग्य वेळी निर्णय घेऊ,  असे सांगून त्या संभ्रमावस्थेत असल्याचे दाखवून दिले आहे.

मुंडे साहेब अर्थात आपल्या वडीलांच विकासाचे अधुरे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनतेला  दिलासा देण्याचे नाटक करण्याऐवजी सरकारने सरसकट पॅकेज जाहीर करावे.अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी परभणीत  सांगितले. पंकजा मुंडे यांची संघर्ष यात्रा जिंतूर येथे दाखल झाली.

मला अनुकंपा तत्त्वावर मंत्रिपद नकोय, माझ्या कर्तृत्वावर मी ते मिळवीन,’ असा आत्मविश्वास आमदार पंकजा  पालवे-मुंडे यांनी शुक्रवारी कंधारच्या सभेत व्यक्त केला.

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या  फेसबुक आणि ट्विटर   पानावर फ़ॉलो करू शकता.

वेबदुनिया वर वाचा