यंदा नियमात राहूनच दहीहंडी : मुख्यमंत्री

शनिवार, 20 ऑगस्ट 2016 (11:10 IST)
कोर्टाच्या निर्णयाविरोधात जाता येणार नाही, यंदा नियमात राहूनच दहीहंडी साजरी करा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी समन्वय समितीला दिला.

सर्वोच्च न्यायालयाने 18 वर्षांखालील गोविंदावर बंदी घातली आहे. तसेच 20 फुटांपेक्षा जास्त उंचीचा थर उभारण्यासही मनाई केली आहे. त्यामुऴे दहीहंडी समन्वय समितीने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
18 ऑक्टोबरच्या सुनावणीवेळी महाधिवक्त्यांना न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्याची विनंती करु, नियमात राहूनच दहीहंडी साजरी करा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा