मोबाईल फोनचा स्फोट, तरुणाचा पाय भाजला

शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016 (17:45 IST)
ठाण्याजवळ असलेल्या शहापूरमधील वासिंदमध्ये एका तरुणाच्या मोबाईल फोनचा स्फोट झाला आहे. यामध्ये त्याचा पाय भाजला आहे. यात करण ठाकरे असे तरुणाचे नाव आहे. 
 
सदरचा मोबाईल कार्बन कंपनीचा फोन होता. करणने नेहमीप्रमाणे पँटच्या खिशात मोबाईल ठेवला होता. मात्र अचानक स्फोट झाल्याने फोन फुटला आणि त्याच्या डाव्या पायाची मांडी भाजली.

वेबदुनिया वर वाचा