मुसळधार पावसाने महाराष्ट्र सुखावला

सोमवार, 14 सप्टेंबर 2015 (11:18 IST)
दुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर परतीच्या पावसाने झोडपण्यास सुरुवात केल्याने महाराष्ट्रात सुखावला आहे. पेरण्या वाया गेल्या असल्या तरी पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.

राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.  तसेच पश्चिम-मध्य व लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टाही कायम आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोर धरला आहे. पुढील चार दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतही पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा