मुद्दाम रखडली पुण्याची मेट्रो : चव्हाण

शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (11:38 IST)
नागपूर आणि पुणे मेट्रोचा प्रस्ताव एकाच दिवशी केंद्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारच्या केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने या दोन्ही मेट्रोला मंजुरी दिली असताना, केवळ नागपूरचे नेते किती कार्यक्षम आहेत, हे दाखविण्यासाठी जाणूनबुजून केवळ नागपूर मेट्रोचेच उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे भाजपा सरकारची पुण्याबाबत आकसाची भावना दाखवित असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  केली. 

वेबदुनिया वर वाचा