मुंबई विमानतळावर बसच्या धडकेने एक ठार

एएनआय

रविवार, 30 मार्च 2008 (14:54 IST)
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या बसची धडक बसल्याने एका श्रमिकास प्राण गमवावा लागला. खंबाटा एव्हिएशनमध्ये श्रमिक असलेल्या ज्ञानेश्वर आप्पा कुंटे बसच्या धडकेने जागीच ठार झाले.

अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला, मात्र त्याची ओळख पटली असून लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा