मुंबईहून दहा तासांत पोहोचणार नागपूरला

शनिवार, 1 ऑगस्ट 2015 (14:38 IST)
भाजपा सरकारच्या काळात झालेल्या महामार्ग जोडणीच्या योजनेस पुन्हा गती येणार आहे. मुंबई आणि उपराजधानी नागपूर ला जोडणारा ३० हजार कोटी रुपये खर्चाचा नवा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे अंतर केवल दहा तासांत पार करता येणार आहे.

याबाबत विधानसभेत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई-नागपूर हे सुमारे आठशे किलोमीटर लांबीचे अंतर मोटारीने पार करण्यासाठी सोळा तास लागतात. नवा दु्रतगती महामार्ग झाला तर हेच अंतर सहा तासांनी कमी होईल. मुंबई-घोटी-औरंगाबाद-अमरावती-नागपूर असा हा प्रस्तावित मार्ग आहे. नव्या एक्स्प्रेस वेची सर्व कामे सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे.

वेबदुनिया वर वाचा