शिवसेनाचे अरविंद सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे आदित्य शिरोडकर आज लोकसभा निवडणूकीसाठी नामांकन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन परिस्थिती नियंत्रणात आणली असून लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि मनसेतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. लाठीमारात काही लोक जखमी होण्याची शक्यता आहे. हाणामारीत एक पत्रकार देखील जखमी झाला आहे.