उन्हाचा जोरदार चटका, दगडफेकीच्या घटना आणि पैशाचे खुलेआम वाटप, अशा वातावरणात महापालिका निवडणुकीसाठी रंगाबादकरांनी बुधवारी सरासरी ६३ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान पाच ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या, तर एका ठिकाणी जोरदार राडा झाला. दोन उमेदवारांच्या घरावर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. २०१० च्या निवडणुकीत केवळ ५८ टक्के मतदान झाले होते. गुरुवारी मतमोजणी होईल.