मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणे सुरूच

भाषा

मंगळवार, 29 जुलै 2008 (15:04 IST)
मुंबईस आज सकाळीही पावसाने झोडपून काढले. हवामान खात्याप्रमाणे दक्षिण मुंबईत 48.6 मिलिमिटर पावसाची नोंद झाली तर उत्तर मुंबईत 134.8 मिलिमिटर पाऊस नोंदवल्या गेला.

येत्या चोवीस तासातही जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम रेल्वेची उपनगरीय वाहतूक सुरळीत सुरू आहे मात्र मध्ये रेल्वे उपनगरीय गाड्या पाच ते दहा मिनिटांची उशीराने धावत आहे.

मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा