मुंबईत पहाटेपासून पावसाचा जोर

शनिवार, 27 ऑगस्ट 2016 (11:11 IST)
मुंबई शहर, उपनगरासह नवी मुंबईतही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.

दादर, माटुंगा, परळमध्येही पहाटेपासून पाऊस सुरु आहे. नवी मुंबई परिसरातही मुसळधार पाऊस आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी भागातही पावसाला सुरुवात झाली आहे. विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव या पश्चिम उपनगरांसह भांडुप, विक्रोळी, मुलुंडमध्ये पाऊस आहे.

वेबदुनिया वर वाचा