मुंबई- इस्लामिक स्टेट या जागतिक दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी 26 वर्षीय अश्फाक अहमद, त्याची पत्नी, त्यांची लहान मुलगी आणि मुहम्मद सिराज वय 22 आणि एजाज रेहमना वय 30 या पाच जणांनी भारत सोडल्याचे निष्पन्न झाले आहे. हे पाचही जण मुंबईतले आहेत.
रेहमान हा डॉक्टर तर सिराज हा उद्योगपती आहे. या पाची जणांनी इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या जून महिन्यातच भारत सोडल्याचे समोर आले आहे.