मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रात स्फोट, 5 ठार

WD
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साकीनाका परिसरातील औद्योगिक क्षेत्रात आज पहाटे 2 च्या सुमारास जोरदार स्फोट झाला. त्यानंतर तेथील एका कंपनीला भीषण आग लागली. घटनेचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे चार बंब आणि तीन रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या. या घटनेत जखमी झालेल्या आठ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. इतर तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर आवश्‍यक उपचार केले जात आहेत.

स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजले नसून गॅस सिलिंडरमुळे स्फोट झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा