मुंबईकरांसाठी साकारतील 'ईको फ्रेंडली' घरे

भाषा

रविवार, 30 मार्च 2008 (17:56 IST)
मुंबईत घरबांधकामांच्या झपाट्यास नियंत्रित करण्यासाठी 'ईको फ्रेंडली' घरे साकारण्यात येणार आहे. निवासी इमारतींचे बांधकाम व पुनर्विकासासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येईल. मात्र योजनेची अंमलबजावणी स्वेच्छेने करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी विधानसभेत सांगितले.

'ईको हाऊसिंग' प्रकल्पाअंर्तगत इमारतींना एनव्हायरनमेंटल आर्किटेक्चर, पाणी व ऊर्जा बचत, सांडपाणी व्यवस्थापण, सौरऊर्जेचा वापर, पावसाचे पाणी साठवणे, सांडपाणी शुद्धीकरण युनिट, व झाडे लावणे यासारख्या बाबींची पूर्तता करावी लागेल.

यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात येत असून विकास शुल्क व मालमत्ता करात विशेष सुट देण्याची तरतूदही करण्यात येईल. बीएमसीने 'ईको फ्रेंडली घरांसाठी' राज्य सरकारला मागील वर्षी प्रस्ताव सादर केला होता. पुणे महानगरपालिकेने ही संकल्पना राबवण्यास अगोदरच सुरूवात केली आहे.

वेबदुनिया वर वाचा