महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील दंगलीत दोघांचा मृत्यू

सोमवार, 11 ऑगस्ट 2014 (10:59 IST)
वनजमिनी अधिग्रहित करण्याच्या कारणावरून महाराष्‍ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील अंबेखंबाळे येथे दोन गटात उसळलेल्या दंगलीत दोघांचा मृत्यू झाला. 
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पळासनेरपासून काही अंतरावर असलेल्या अंबे गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबे खंबाळे परिसरात दोन गटात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास तुफान हाणामारी झाली. बदल्याच्या भावनेतून ही घटना घडल्याचा पोलिसांना संशय आहे. मृतांमध्ये एक महाराष्‍ट्रातील तर दुसरा  मध्य प्रदेशातील रहिवासी आहे.

वेबदुनिया वर वाचा