महाराष्ट्रात सरकार पडणार; मध्यावधी लागणार!

गुरूवार, 2 जुलै 2015 (10:33 IST)
मंत्र्यांची गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर पडून लागल्याने भाजपाचा खरा चेहरा पुढे आला असून राज्यात भाजपाचे सरकार पडणार आणि मध्यावधी निवडणूक लागणार, असे भाकित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले, भाजपाने मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षणाची घोषणा केली होती. सत्तेवर येताच एलबीटी रद्द करू असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात कोठेही अंमलबजावणी नाही़ भाजपाची ही आश्वासने म्हणजे केवळ अफवांचा पाऊस आहे.

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या कर्जमाफीसाठी ९ व १० जुलै रोजी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे़ शेतकºयांचे प्रश्न, आरक्षण व मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण या विरोधात सभागृहाच्या आत व बाहेर आंदोलन सुरू ठेवणार आहोत, असे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा