मनसेची कोकणातही खांदेपालट?

गुरूवार, 27 नोव्हेंबर 2014 (14:42 IST)
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचा कोकण दौरा होतो न होतो तोवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कोकण दौºयाची आखणी केली आहे. 
 
डिसेंबरमध्ये त्यांचा कोकण दौरा नियोजित आहे.
विधानसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर या अपयशाची कारणे शोधण्यासाठी व पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्याचा दौरा करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच पुण्यात येऊन सामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधून पदाधिकार्‍याची नवनियुक्ती करुन त्यांनी बदलास सुरुवातही केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी डिसेंबरमध्ये कोकण दौर्‍याचे नियोजन केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुक्काम करुन ते पदाधिकारी-कार्यकर्ते संवाद साधणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा