भीषण अपघातात ३ ठार

शनिवार, 20 डिसेंबर 2014 (15:46 IST)
भरधाव मोटारीने कंटेनरला जोरदार धडक दिल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. पुण्यात जांभूळवाडी येथे महामार्गावर ही घटना घडली असून यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

मारुती स्विफ्ट ही मोटार बंगळूरहून पुण्याकडे येत होते. समोरुन चाललेल्या कंटनरने अचानक गती केल्याने मोटारचालकाचा ताबा सुटला आणि ती कंटेनरला धडकून अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. चिन्मय अनिरुद्ध बर्वे (वय २६), यतीन दिलीप मुळे (वय २६) आणि विभा राव (वय २५) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये सागर देशमुख (वय २९), अमृता सागर देशमुख (वय २५) आणि भूषण श्रीपाद बर्वे (वय २९) यांचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा