कसुरी यांच्या 'नीदर ए हॉक नॉर ए डव: एन इनसाइडर्स एकाउंट ऑफ़ पाकिस्तांस फॉरेन पॉलिसी' या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत होत आहे. हा कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सुधींद्र कुलकर्णी यांनी ट्विटर पार्ट टाकली असून त्यामध्ये त्यांच्या तोंडावर काळी शाई फासल्याचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. शिवसैनिकांनी शिवीगाळ करत आपल्यावर शाई फेकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.