भाजपाला विरोध करा; भारतमातेला करू नये : मुख्यमंत्री

सोमवार, 4 एप्रिल 2016 (11:31 IST)
भारतमाता की जय, वंदे मातरम या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून, विरोधकांनी प्रसंगी भाजपाला विरोध करावा; परंतु भारत मातेला विरोध करू नये; भारतमाता की जय न म्हणणाऱ्यांना देशात राहण्याचा कोणताच अधिकार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
भाजपाच्या राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, भारतमाता की जय म्हणायचे की नाही यावरून सध्या देशात वाद सुरू असून,  नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे़. भारतमाता की जय न म्हणणाऱ्यांना देशात राहण्याचा कोणताच अधिकार नाही.

वेबदुनिया वर वाचा