भाजपच्या सत्तारोहण सोहळ्यावर शिवसेनेचा बहिष्कार!

शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2014 (11:04 IST)
भाजपच्या नव्या राज्य सरकारमध्ये शिवसेना सहभागी होणारच नाही हे स्पष्ट झाले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व संघटनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी म्हटले की, सन्मान नसेल तर अशा सत्तेत आम्ही का सहभागी व्हावे? आजच्या शपथविधी सोहळ्यात शिवसेना सहभागी होणार नाही असे संकेत प्राप्त होत आहेत.
 
गेले आठ दिवस शिवसेनेने विविध स्तरांवर भाजपबरोबर जुळवून घेण्याचे प्रयत्न केले मात्र भाजपने कोणताही प्रतिसाद दिला नाही. माजी गटनेते सुभाष देसाई व राज्यसभा सदस्य पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांच्याशी तसेच भाजपचे भावी प्रांताध्यक्ष मानले जाणारे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी सत्तेतील सहभागाबाबत चर्चा केली. 1995 च्या शिवसेना-भाजपच्या सत्तावाटपाचे सूत्र कायम ठेवावे ही शिवसेनेची पहिली मागणी होती. मात्र ते शक्य नाही हे भाजपने सांगितले तेव्हा महसूल, गृह, उच्च तंत्रशिक्षण आदी महत्त्वाच्या खात्यांसह किमान 14 मंत्रिपदे तसेच एक उपमुख्यमंत्रिपद असे शिवसेनेला मिळावे अशी शिवसेना नेत्यांची मागणी होती. मात्र तीही भाजपने अमान्य केली. शिवसेनेने बिनशर्त पा¨ठबा जाहीर करावा आणि नंतर पदांबाबतची चर्चा करता येईल अशी भाजपची भूमिका असल्याचे सांगण्यात आले. 
 
शिवसेनेचे अन्य नेते चर्चा करत असताना स्वत: उद्धव ठाकरे यांनी मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याच नाहीत. काल सायंकाळी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी घेतली त्यात विरोधी पक्षातच बसून जनतेची कामे करावीत असा सूर उमटला. आज शिवसेनेच्या नेतंची जी बैठक होणार होती ती मात्र झालीच नाही. अद्याप शिवसेनेने जाहीर कोणतेही विधान केलेले नसले तरी आता या पुढे भाजपपुढे अधिक न झुकता विरोधी बाकांवर बसण्याची तयारी शिवसेनेने सुरू केलेली आहे हे स्पष्ट झाले. उद्या होणार्‍या शपथविधी सङ्कारंभात उद्धव ठाकरे, अन्य शिवसेना नेते वा शिवसेनेचे आङ्कदार सहभागी होणार नाहीत असेही शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, भाजपकडून सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल, याची प्रतीक्षा करून कंटाळलेल्या शिवसेनेच्या ‘सामना’ मुख्यपत्रात अखेरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आता राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणार का, असा प्रश्न भाजपला विचारला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत शिवसेनेने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
 
‘विदर्भाचा सुपुत्र महाराष्ट्राने कवटाळला’ असे सामनाच्या आजच्या अग्रलेखाचे शीर्षक आहे. ज्या विदर्भातून देवेंद्र ङ्खडणवीस आलेत, त्या विदर्भात राष्ट्रवादीने सिंचन घोटाळे करून ठेवलेत. आता त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवले जाणार का, असा सवाल या अगल्रेखात विचारला आहे. शरद पवार यांनी फडणवीस सरकारला न मागता पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवले जाणार आहे काय? महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व काँग्रेसमुक्त करण्याचे वचन देऊन आपण सत्तेवर आला आहात आणि ज्या विदर्भातून आपण आला आहात त्याच विदर्भात जलसिंचनाचे मोठे घोटाळे राष्ट्रवादीवाल्यांनी करून ठेवले आहेत. त्यामुळे देवेंद्र सरकारच्या पावित्र्याच्या प्रश्न सुरुवातीपासूनच निर्माण झाल्याचे या अग्रलेखात म्हटले आहे. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले आहे ते भ्रष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीला कायमचे गाडण्यासाठी; पण त्याच राष्ट्रवादीने पहिल्याच दिवशी पाठिंब्याचा खेळ करून दूध नासवण्याचा प्रयत्न केला. हे नासके दूध नव्या सरकारला बाळसे देणार असेल, तर हा विषय फार न लांबवता इथेच पूर्णविराम दिलेला बरा, असेही या अग्रलेखात म्हटले आहे. मात्र राज्य स्थिर असावे व स्थिर राज्याचा मुख्यमं स्थिर असावा, अशी अपेक्षा यात व्यक्त करण्यात आली आहे. 

वेबदुनिया वर वाचा