पुण्यात हिट अँण्ड रन; महिलेचा मृत्यू

सोमवार, 18 जुलै 2016 (10:37 IST)
कॉसमॉस बँकेचे चेअरमन मुकुंद अभ्यकर यांच्या गाडीने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. हिट अँण्ड रन केस प्रकरणी अभ्यकर यांना अटक करण्यात आली आहे.

अरुंधती गिरीष हसबनीस असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अरुंधती त्यांच्या दुचाकीवरुन भांडारकर रस्त्यावरुन मैत्रीणीकडे जात होत्या. लॉ कॉलेज रस्त्याकडून त्या गुडलक हॉटेलच्या दिशेने जात होत्या.

वेबदुनिया वर वाचा